रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष

By Admin | Updated: October 20, 2016 02:06 IST2016-10-20T02:06:58+5:302016-10-20T02:06:58+5:30

‘मॅनहोलची बाहेर आलेली झाकणे, खचलेले पेव्हर ब्लॉक, वाहून गेलेले गतिरोधक अशा परिस्थितीत भांडुपकरांना प्रवास करावा लागत आहे.

The neglect of the children in the heart of the road | रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष

रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष


मुंबई : ‘मॅनहोलची बाहेर आलेली झाकणे, खचलेले पेव्हर ब्लॉक, वाहून गेलेले गतिरोधक अशा परिस्थितीत भांडुपकरांना प्रवास करावा लागत आहे. भांडुप पूर्व रेल्वे स्थानक ते दातार कॉलनी परीसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.
भांडुप पूर्व येथील गणेश शंकर देवकर गुरुजी मार्गावरील रस्त्यांची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. पावसाळ््यात पालिकेने या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. आता पावसाळा संपला तरी येथील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शंकर देवकर गुरुजी मार्ग ते स्टेशन परीसरातील रस्ते पेव्हर ब्लॉकचे आहेत. हे पेव्हर ब्लॉक ठिकठिकाणी खचले आहेत. अनेक ठिकाणी असलेली मॅनहोलची झाकणे मुख्य रस्त्याला समांतर नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या झाकणांचा अंदाज येत नाही, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गतिरोधकांची सुद्धा दुरवस्था झाली आहे. गतिरोधक वाहून गेले आहेत. तरीही या गतिरोधकांची दुरुस्ती गेल्या चार महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
>गणेश शंकर देवकर गुरुजी मार्ग म्हणजेच दातार कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जलवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. येथील पेव्हर ब्लॉक काढण्यात आले. या पेव्हर ब्लॉकचे ढिगही रस्त्यांवर रचून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडथळा होत आहे. याप्रकाराबाबत टी वार्डच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांच्याशी या याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
>भांडुप पूर्वेकडील देवकर गुरुजी चौकापासून ते डी.ए.वी महाविद्यालयापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी नवख्या वाहनचालकाला येथील रस्त्यांचा अंदाज येत नाही. येथील मॅनहोलची झाकणे रस्त्याला समांतर नाही. शिवाय सतत जलवाहिन्यांवरील वॉलच्या झाकणांवरुन सतत गाड्या जातात. त्यामुळे त्यांची झाकणे सुद्धा खाली गेली आहेत.- राजू दिवटे, रिक्षाचालक
>भांडुप पूर्व स्टेशनपासून ते देवकर चौकावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. येथील रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक दुरुस्तीवेळी काढण्यात येतात. पण ते पुन्हा बसवले जात नाहीत.
- क्रिस्टीना डिसोजा, रहिवासी
भांडुप पूर्वे स्टेशनपरीसरापासून ते दातार कॉलनीपर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गतिरोधक वाहून गेले आहेत. पावसाळ्यात डेब्रिज टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.
- शुभदा दाते, रहिवासी

Web Title: The neglect of the children in the heart of the road