शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 11:54 IST

निसर्गसंपत्तीच्या वापराबाबतचे सध्याचे धोरण विनाशकारी आहे.

ठळक मुद्देलोकाधिकार मंच सेवाभावी संस्थेच्या मागण्या : ३५८ पैकी २०१ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर७६ पैकी ६७ तालुक्यात पाण्याची पातळी आठशे फुटांपेक्षा खाली

पुणे : अन्न, चारा, रोजगार, पाणी व कौशल्य विकास कार्यक्रमांची सांगड घालून कार्यक्रम राबवण्यात यावेत. पावसाचं पाणी संकलित करण्यासाठी काटेकोर नियम व अंमलबजावणी करावी. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी अशा मागण्या महाराष्ट्रीय लोकाधिकार मंच सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित विभागीय पत्रकार परिषदेत केल्या.यावेळी टाटा इन्स्टिट्यूट प्रा रोहित जैन (तुळजापूर), डॉ. संपत काळे, विश्वनाथ तोडकर (उस्मानाबाद), सारंग पांडे (संगमनेर), ललित बाबर (सांगोला), दलित आदिवासी अधिकार आंदोलनचे प्रियदर्शी तेलंग, भारिप-बहुजन महासंघाच्या अंजली मायदेव-आंबेडकर असे विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते. निसर्गसंपत्तीच्या वापराबाबतचे सध्याचे धोरण विनाशकारी आहे. शासनाने वैज्ञानिक पायावर व सामाजिक न्यायाची बूज राखणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना करावी. राज्यातील जल मृदा संवर्धनाची काम हातात घ्यावीत. तालुक्यांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. तिथे बोअर वेल पाडण्यावर देखरेख ठेवण्यात यावी. यंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. राज्यातील ३५८ पैकी २०१ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती असूनही १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थितीची घोषणा करून सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. दरवेळी दुष्काळाचे खापर पावसावर फोडले जाते. हे जलसंकट मानवनिर्मित व शासनाच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक आहे. दुष्काळाचे संकट अधिकाधिक गहिरे होत चालले आहे, असे मुद्दे मांडण्यात आले.तोडकर म्हणाले, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाला आहे. ७६ पैकी ६७ तालुक्यात पाण्याची पातळी आठशे फुटांपेक्षा खाली गेली आहे. येथे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर कारखाने आहेत. कारखान्यासाठी मुबलक पाणी दिले जाते. परंतु शेती, पशुसंवर्धन, पिण्यासाठी पाणी दिले जात नाही. त्यामुळे जायकवाडी धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अंजली मायदेव आंबेडकर म्हणाल्या, दलित आणि भटक्या विमुक्त वसाहतीत पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बहुजन वस्तीत पाणी पुरवले जात नाही. महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळ निर्माण झाला आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. भविष्यात भीषण दुष्काळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणीRainपाऊस