शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 15:14 IST2023-07-02T15:13:47+5:302023-07-02T15:14:03+5:30
अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे.

शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत
अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते.
तसेच विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राष्ट्रवादीचे प्रतोद, दोन खासदार सुनिल तटकरे आणि अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात आहे.