Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “काही नॉटी मुलं…”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 05:06 PM2023-02-15T17:06:36+5:302023-02-15T17:07:48+5:30

Maharashtra News: उपमुख्यमंत्रीपद आणि सहा-सहा खाती असून, देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला वेळ कसा मिळतो, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.

ncp supriya sule replied bjp devendra fadnavis statement about sharad pawar | Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “काही नॉटी मुलं…”

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “काही नॉटी मुलं…”

googlenewsNext

Maharashtra Politics: भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. 

शाळेत काही विद्यार्थी असतात. ज्यांचे लक्ष सातत्याने खिडकीच्या बाहेर असते. पण अभ्यासात सहाही विषयात ते नापास होतात. अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. मला वाटते, त्यांची खिडकीतील जागा बदलून त्यांना वर्गात मध्यभागी बसवायला हवे. कारण शाळेत काही नॉटी मुले असतात, त्यांचे खिडकीतून बाहेर लक्ष जाऊ नये म्हणून शिक्षक त्यांची जागा बदलतात. फडणवीसांनाही असेच मध्यभागी बसवायला हवे, त्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रीत करता येईल, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 

देवेंद्र फडणवीसांना कंड्या पिकवायला वेळ कसा मिळतो?

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सहा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अर्थमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. असे असूनही कंड्या पिकवायला त्यांना वेळ कसा मिळतो? असा खोचक सवाल करत, उपमुख्यमंत्रीपद असणे आणि सहा-सहा खाती सांभाळणे, हे खूप जबाबदारीचे काम आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

दरम्यान, तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. मीडियात त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp supriya sule replied bjp devendra fadnavis statement about sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.