“…आणि तुमचं तोंड विषाणूमुक्त होईल, चांगले शब्दही बाहेर पडतील;” पडळकरांना राष्ट्रवादीचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:38 IST2022-06-08T14:15:48+5:302022-06-08T14:38:36+5:30
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना पडळकरांची जीभ घसरली होती.

“…आणि तुमचं तोंड विषाणूमुक्त होईल, चांगले शब्दही बाहेर पडतील;” पडळकरांना राष्ट्रवादीचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांची (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा जीभ घसरल्याचं दिसून आलं होतं. नाशिक येथील कांदा परिषदेत बोलताना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“गोपीचंद पडळकर तुमच्या तोंडात विषाणू आहे असं दिसून येतं. सध्या तुमच्या तोंडातून केवळ घाण आणि अपशब्द बाहेर पडतायत. म्हणून मी तुम्हाला माऊथ वॉश भेटवस्तू म्हणून पाठवतोय. रोज सकाळी यानं चूळ भरा. यामुळे तुमचं तोंड विषाणूमुक्त होईल आणि तुमच्या तोंडातून चांगले शब्द बाहेर पडतील,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.
गोपीचंद पडळकर तुम्हाला मी एक भेटवस्तू आणि संदेश पाठवीत आहे@GopichandP_MLCpic.twitter.com/PpePgGYcyD
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) June 8, 2022
चौंडीच्या कार्यक्रमावरुन पडळकरांची टीका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली. यावेळी, त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांना आताच का चौंडी आठवली? ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकदाही ते चौंडीला आले नाहीत. चौंडीला कार्यक्रम होतात ते पवारांना थेट २०२२ मध्येच कळले का? शरद पवार हे केवळ नातवाच्या प्रेमापोटी चौंडीला आले आहेत, असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला होता.