“अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:44 IST2026-02-06T14:43:37+5:302026-02-06T14:44:37+5:30

MP Bajrang Sonawane: या घटनेचा तपास सार्वजनिक करायला हवा. अजित पवार घरून निघतानाचे आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

ncp sp group mp bajrang sonawane has a different doubt about deputy cm ajit pawar sad demise in airplane accident in baramati | “अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका

“अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका

MP Bajrang Sonawane: मला घडवण्यामध्ये अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. १९९९ पासून त्यांचा आणि माझा संबंध आला. संपूर्ण महाराष्ट दु:खात आहे, देश दु:खात आहे. हा सर्व नियतीचा खेळ आहे. येथील कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत. या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल. संपूर्ण बीड जिल्ह्यात नसेल, असे स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार आहोत. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. 

पत्रकारांशी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले की, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत भाष्य करणार नाही, कारण ती वेळ नाही. अजित पवार यांनी हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असे आम्ही काम करणार आहोत. राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. दहा दिवस दुखवटा असल्याने माध्यमांशी बोललो नाही. अजितदादांचा आम्हाला आधार होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. 

अजितदादांच्या विमानात ३ ब्लास्ट कसे झाले, बॉम्ब ठेवलेला का?

अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेबाबत वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा तपास झाला पाहिजे. घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात ६ लोक होते, मग ५ जणांचे मृतदेह कसे मिळाले? अजित पवार यांचे विमान हवेत असतानाच तीन स्फोट झाले, ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे, अशी शंका बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केली.

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे CCTV फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. वर विमान ब्लास्ट का झाले? अजित पवार घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे, असेही बजरंग सोनावणे म्हणाले.

 

Web Title : अजित पवार के विमान हादसे पर सोनावाने को बम का शक, जांच की मांग।

Web Summary : सांसद बजरंग सोनावाने ने अजित पवार के निधन पर शोक व्यक्त किया और उनके साथ अपने संबंधों को याद किया। उन्होंने विमान दुर्घटना पर सवाल उठाते हुए बम की आशंका जताई और सीसीटीवी फुटेज की जांच की मांग की।

Web Title : Ajit Pawar's plane crash: Sonawane suspects bomb, demands investigation.

Web Summary : MP Bajrang Sonawane mourns Ajit Pawar, recalling their bond and planned memorial. He questions the plane crash, suggesting a possible bomb and demanding CCTV footage review and thorough investigation of the incident.