शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

NCP शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर? ‘मविआ’त येऊन महाराष्ट्रधर्माचे पालन करायचे आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:10 PM

NCP SP Group Reaction On MNS Raj Thackeray Delhi Visit: महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याने म्हटले आहे.

NCP SP Group Reaction On MNS Raj Thackeray Delhi Visit: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रकाश आंबेडकर यांना अल्टिमेटम दिल्याचा दावा केला जात असून, दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चार दिवसांतील दुसऱ्या दिल्लीवारीमुळे त्यांच्या महायुतीमधील सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याने राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याबाबत आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.

मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून, मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रधर्म पालनाची आठवण करून दिली आहे. 

महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत यावे

महाराष्ट्रातील जनता भाजपासोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजपा लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे, असे रोहित पवार म्हणाले. राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी महाविकास आघाडीसोबत यावे ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. २०१९ मध्ये भाजपने छोट्या पक्षांना योग्य वागणूक दिली नव्हती, हे लक्षात घ्यावे. आता भाजपासोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, २०१९ प्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर योग्य नाही. लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. लढायची परिस्थिती असताना भाजपाबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढले पाहिजे. तसेच महाराष्ट्राच्या बाजूने लढणे महत्त्वाचे आहे. ऑफर देणारा मी कोण आहे. आमचे नेते यासंदर्भात निर्णय घेतील. माझे एकच मत आहे की त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीRohit Pawarरोहित पवार