शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus: “प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, भाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमान” 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 4:42 PM

CoronaVirus: प्रवीण दरेकरांना (BJP Pravin Darekar) महाराष्ट्र द्वेषाने पछाडले आहे, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंयभाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमानराष्ट्रवादीच्या महिला आघाडी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून पलटवार

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रवीण दरेकरांना (BJP Pravin Darekar) महाराष्ट्र द्वेषाने पछाडले आहे, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे. (ncp rupali chakankar criticise pravin darekar over corona situation politics)

उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे. कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेले Ventilators, Oxygen, Remdesivir, Vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? असे म्हणत दरेकरांनी टीकास्त्र सोडले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

“आता राज्यातील सर्व गुन्ह्यांची उकल ‘एनआयए’ने करावी काय?”; भाजपचा थेट सवाल

प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं आहे

एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत, आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये, अशी टीका चाकणकर यांनी करत अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय. नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे, ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही  तुम्हाला देऊ शकतो, असा टोला चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. 

मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी

केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे, मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन, असे ट्विट अमिताभ कांत यांनी केले आहे. 

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण