मुंबई - अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने चौकशी आणि FIR दाखल करण्याची मागणी करणारे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत रोहित पवारांनी विमान अपघाताबाबत असलेल्या शंका राज ठाकरेंना सांगितल्या. राज ठाकरे यांनीही रोहित पवार यांच्याकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर या भेटीत राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे २ दाखलेही रोहित पवार यांना दिले. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या भेटीनंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राज ठाकरेंना माहिती दिली. जी काही माहिती मी घेऊन गेलो ती त्यांनी समजून घेतली. FIR पोलिसांनी का घेतला नाही असं राज ठाकरेंनी विचारले. त्यांचा अभ्यास असल्याने सुप्रीम कोर्टाच्या २ निर्णयांचा दाखलाही त्यांनी दिला. अपघाती मृत्यू असला तरी FIR नोंदवता येतो हा नागरिकांचा अधिकार आहे आणि काहीही झाले तरी पोलिसांना FIR नोंदवावा लागतो असे २ दाखले त्यांनी दिले. या महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याचा असा मृत्यू होतो ज्याचा FIR घेतला जात नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे असं राज ठाकरेंनी म्हटल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
तसेच याबाबतीत राज ठाकरे काय भूमिका घेतील हे येत्या काळात आपल्याला दिसेल. परंतु त्यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी सांगितल्या. दादांसोबत त्यांनी जवळून काम केले आहे. जेव्हा वेळ मिळायचा आम्ही भेटायचो असंही राज ठाकरे यांनी सांगितले. तर दादा असो किंवा अन्य कुणी मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर जे काही करायचे ते आमच्या पातळीवर आम्ही करू असं राज ठाकरेंनी आश्वस्त केले अशी माहिती रोहित पवारांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, विमान अपघात झाला की घातपात झाला याचा तपास होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात FIR घेतला जात नाही. महाराष्ट्रात अशी घटना होत असेल तर योग्य नाही. योगायोगाने आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी माणसांसाठी राज ठाकरे सातत्याने लढत आले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातूनही कार्यकर्त्यांच्या मदतीने या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही पाठिंबा आणि ताकद द्यावी अशी मागणी रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली होती. त्यावर दादांना न्याय कसा मिळेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असा शब्द राज ठाकरेंनी दिला.
Web Summary : Rohit Pawar met Raj Thackeray, seeking support for an FIR regarding Ajit Pawar's plane accident. Thackeray cited Supreme Court precedents, emphasizing the right to file an FIR even in accidental deaths and assured assistance to ensure justice.
Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान हादसे पर एफआईआर दर्ज कराने के लिए राज ठाकरे से मुलाकात की। ठाकरे ने सुप्रीम कोर्ट के उदाहरणों का हवाला देते हुए कहा कि आकस्मिक मौतों में भी एफआईआर दर्ज करने का अधिकार है और न्याय सुनिश्चित करने में मदद का आश्वासन दिया।