ncp nawab malik replied bjp and devendra fadnavis over remdesivir issue | देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार

ठळक मुद्देनवाब मलिक यांचे भाजपला सडेतोड प्रत्युत्तरनवा मोदी कायदा आलाय का? - मलिकलोकहितासाठीच आम्ही बोलत होतो - मलिक

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर असून, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना दिसत आहे. कोरोना परिस्थितीवरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही टीका करण्यात आली होती. देशात नवा मोदी अ‍ॅक्ट आलाय की काय, अशा शब्दांत मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. (nawab malik replied bjp and devendra fadnavis over remdesivir issue) 

देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण, काही पक्षाना राजकारण करण्याशिवाय काहीच काम नाही. महाराष्ट्रात भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. देशातील सात रेमडेसिवीर कंपन्यांना केंद्राने परवानगी दिलेली आहे. दुसरीकडे रुग्णांचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते, असे नवाब मलिक म्हणाले.

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

नवा मोदी कायदा आलाय का?

देशात नवा मोदी कायदा आलाय की काय, अशी विचारणा यावेळी मलिक यांनी केली. रेमडेसिविरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मलिक यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना काही कंपन्या राज्य सरकारला रेमडेसिविर द्यायला तयार नव्हत्या. ब्रुक फार्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएनं परवानगी दिली होती. मात्र, ही कंपनी केंद्रशासित दमणमध्ये रेमडेसिविरची निर्मिती करते. तेथील प्रशासनानं महाराष्ट्राला पुरवठा करता येणार नाही असे निर्बंध त्यांच्यावर घातले होते. त्यामुळं कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होते आहे असा मुद्दा मी उपस्थित केला होता, असे मलिक यांनी सांगितले.

म्हणून माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय

केवळ राजकारण करण्यासाठी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. लोकहितासाठीच आम्ही बोलत होतो. मात्र, करोना संकटाचा फायदा घेऊन भाजपचे लोक काही दिवसांपासून राज्य सरकारला बदनाम करत आहेत. रेमडेसिविरचा मुद्दा उपस्थित केल्यामुळेच माझ्या राजीनाम्याची मागणी होतेय. जावयाला अटक झाल्यामुळे मलिक केंद्र सरकारच्या विरोधात बोलताहेत, असे फडणवीस म्हणत होते. पण महाराष्ट्राची जनता सर्व काही जाणते. माझ्या जावयाचा विषय न्यायालयात आहे. तिथे काय व्हायचे, ते होईल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. 

 “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, नवाब मलिक यांनी खोटा आरोप केला असून, त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोक महाराष्ट्र सोडून चालले आहेत, असे उलट आरोप करत भाजपने मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. भाजपचे काही नेते राज्यपालांनाही भेटले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ncp nawab malik replied bjp and devendra fadnavis over remdesivir issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.