शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 4:22 PM

Coronavirus Dr. Amol Kolhe : अमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती.

ठळक मुद्देअमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसताना दिसला होता. परंतु सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. यापूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोसदेखील घेतले होते.

"कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी परंतु प्रकृती स्थिर आहे," असं अमोल कोल्हे म्हणाले. "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा आणि सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावी. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावं," असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  देशात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत घटदेशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९७.५७ टक्के जण बरे झाले. आजवर केलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ५० कोटींवर पोहोचली आहे. ३ कोटी २३ लाख २२ हजार २५८ कोरोना रुग्णांपैकी  ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० जण बरे झाले आहेत. ३ लाख ६४ हजार १२९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या १४९ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना कोरोना लसीच्या ५८.३१ कोटी डोसचा पुरवठा केला आहे. त्यातील ५६ कोटी २९ लाख डोसचा राज्यांनी वापर केला. वाया गेलेल्या डोसचाही या आकडेवारीत समावेश आहे. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसTwitterट्विटर