Ncp mla In touch bjp says Minister Ravasaheb Danve | राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायला तयार नाहीत . त्यातच आता राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच भाजपने विरोधी पक्षातील आमदारांचा पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीचे 17  आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे दानवे म्हणाले. 

दानवे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना म्हणाले की, भाजपमध्ये सद्या सुरु असलेल्या इनकमिंगमुळे जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. पक्षात कुणी आले तरी आपले काम एकनिष्ठेने सुरूच ठेवायचे असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच तुम्हाला न्याय मिळत असतो.

Web Title: Ncp mla In touch bjp says Minister Ravasaheb Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.