शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

'फोन टॅपिंगच्या माध्यमातून हेरगिरी करणं म्हणजे चाणक्यनीती नव्हे'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:47 PM

रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीस सरकारचा समाचार

मुंबई: नेत्यांचे फोन टॅप करण्याला चाणक्यनीती म्हणत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. काही जण वैयक्तिक फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करतात. जनतेचा विश्वास उडाल्यावर फोन टॅपिंगसारख्या गोष्टी करण्याची गरज भासते, असं रोहित पवार म्हणाले. फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन रोहित पवारांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.राजकारण करायचे वेगवेगळे प्रकार असतात. काही जण जनहिताचे निर्णय घेतात. मग जनताच अशा नेत्यांना निवडून देते. त्यांच्या पाठिशी उभी राहते. मात्र काही जण वैयक्तिक हितासाठी सत्ता राबवतात. त्यामुळे अशा मंडळींचा जनाधार कमी होतो. मग निवडणूक जिंकण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या पद्धतींचा आधार घ्यावा लागतो. अशा प्रकारच्या राजकारणाला चाणक्यनीती म्हणत नाहीत, अशी शब्दांत रोहित पवारांनी फडणवीस सरकारवर तोफ डागली. भाजपाला फोन टॅपिंगची गरज का भासली, असा सवाल रोहित यांनी उपस्थित केला. भाजपा लोकशाही मानत नाही. ते फक्त दडपशाही मानतात, असं रोहित पवार म्हणाले. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणात लक्ष घालत आहेत, असं त्यांनी सांगितलं. इतक्या मोठ्या नेत्यांचे फोन टॅप होत असतील, तर मग इतरांचं काय, असा प्रश्नदेखील रोहित यांनी विचारला. भाजपा सरकारकडून सर्वसामान्य जनतेवरदेखील नजर ठेवली गेली असावी, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली. 

काय आहे प्रकरण?फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत