शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Deepali Chavan Suicide Case: पुन्हा दीपाली चव्हाण होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील: सुप्रीया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 8:06 PM

deepali chavan suicide case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांनी केले दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्यदीपाली चव्हाण यांना वाचवण्यात कमी पडलो - सुप्रिया सुळेमन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा हवी - सुप्रिया सुळे

मुंबई : अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण (deepali chavan suicide case) या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा दीपाली चव्हाण होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (ncp leader supriya sule react on deepali chavan suicide case)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दीपाली चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्यासारखी प्रशासकीय यंत्रणा देशपातळीवर नाही. परंतु, अशा घटना घडणे, अतिशय वेदनादायी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी जे काही करायला लागेल, ते आपण करू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दीपाली चव्हाण यांना वाचवण्यात कमी पडलो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील आहेत. ते दीपाली चव्हाण यांना न्याय देतील, असा विश्वास करत दीपाली चव्हाण यांना वाचवण्यात आपण कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. दीपाली चव्हाण यांचे कुटुंब कोणत्या मनःस्थितीतून जात असेल, याची कल्पना करवत नाही. त्यांच्या आईची काय स्थिती असेल, याचा विचारही करू शकत नाही, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. 

मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा

चूक कोणाची आहे, त्यात मी पडत नाही. मात्र, पुरुष किंवा महिला अधिकारी कुणीही असो, त्यांना त्रास होत असेल, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपले मन मोकळे करण्यासाठी हक्काचे जागा असावी, अशी एखादी यंत्रणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उभी करावी. या संदर्भात लोकसभेतही विषय मांडला होता, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

‘‘दीपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर...’’; चित्रा वाघ कडाडल्या

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणSupriya Suleसुप्रिया सुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार