Deepali Chavan Suicide Case: ‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:18 PM2021-03-26T16:18:31+5:302021-03-26T16:21:26+5:30

Deepali Chavan Suicide Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.

ncp leader rupali chakankar criticised on navneet rana over deepali chavan suicide case | Deepali Chavan Suicide Case: ‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

Deepali Chavan Suicide Case: ‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांचे ट्विटदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी केले भाष्यखासदार नवनीत राणा यांच्यावर केला मोठा आरोप

मुंबई : अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, नवनीत राणांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता, असा दावा केला आहे. (ncp leader rupali chakankar criticised on navneet rana over deepali chavan suicide case)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून दीपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून, या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचवू शकलो असतो

सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. 

‘‘दीपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर...’’; चित्रा वाघ कडाडल्या

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.  

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते.

Read in English

Web Title: ncp leader rupali chakankar criticised on navneet rana over deepali chavan suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.