आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 03:26 PM2021-03-26T15:26:08+5:302021-03-26T15:28:05+5:30

bhandup sunrise hospital fire: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

bjp leader devendra fadnavis slams thackeray govt over bhandup sunrise hospital fire | आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

Next
ठळक मुद्देभांडुप आग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीकाया घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे - फडणवीसमुंबई महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा स्पष्ट - फडणवीस

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहे. या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली असून, आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग येणार, या शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे. (bjp leader devendra fadnavis slams thackeray govt over bhandup sunrise hospital fire)

भांडुपमधील ड्रीम्स मॉलमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात करोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

‘‘दीपाली वाचली असती, ही आत्महत्या नाही तर...’’; चित्रा वाघ कडाडल्या

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 

जी घटना घडली, त्यामध्ये सरकार, मुंबई महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असे वाटते की, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्या वतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर

दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली. तिथे जे करानो रुग्ण दाखल होते तेथील सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण काही जण व्हेटिलेटरवर होते त्यांना काढण्यास वेळ लागला. इतर रुग्णांची सुटका झाली पण त्यांची सुटका करण्यात वेळ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. 

फडणवीसजी, लूज बॉलवरच मोठी विकेट जाते, हे लक्षात ठेवावे; संजय राऊतांची गुगली

दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. या रुग्णालयाला दिलेली परवानगी तात्पुरत्या स्वरुपाची होती आणि ती ३१ तारखेला संपत होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

Read in English

Web Title: bjp leader devendra fadnavis slams thackeray govt over bhandup sunrise hospital fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.