शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्याचं काय होईल?; धनंजय मुंडेंचं अवघ्या चार शब्दांत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 16:55 IST

पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आक्रमक भाषण करत राज्यातील पक्ष नेतृत्त्वावर जोरदार टीका केली. पंकजा यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. परळीत माझ्याविरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला ताकद देण्यात आली, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. मात्र त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेणं टाळलं. पंकजांच्या या आक्रमक भाषणावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.पेल्यातलं वादळ पेल्यातच शमेल, अशा शब्दांत पंकजांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. 'माझ्या विरोधात असलेल्या नेत्याला रसद देण्यात आल्याचं त्या (पंकजा मुंडे) म्हणतात. त्यामुळे आम्ही ताकदवान होतो, हे तरी किमान त्या मान्य करतात. सत्ता नसतानाही आम्ही सामर्थ्यशाली राहिलो, यातच सगळं आलं. मतदार त्यांच्यावर नाराज होते, हे त्यांनी मान्य करायला हवं,' अशा मोजक्या शब्दांमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजांना प्रत्युत्तर दिलं.पाच वर्ष सत्ता असूनही गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधता आलं नाही, अशा शब्दांत पंकजांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. तोच धागा पकडत धनंजय यांनी पंकजांना लक्ष्य केलं. पाच वर्षे सत्ता असूनही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधू शकल्या नाहीत. मात्र आमचं सरकार मुंडे सरकारचं स्मारक उभारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून पंकजांनी आज त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण करुन दिली. निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एकेक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसGopinath Mundeगोपीनाथ मुंडे