शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या भेटीत काय घडले?; अजित पवारांच्या विधानातून सगळ्यांनाच कळले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 16:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाणार का, यावरून गेले काही दिवस तर्कवितर्क लढवले जाताहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाणार का, यावरून गेले काही दिवस तर्कवितर्क लढवले जाताहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात तीन जागांवरून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, राज यांच्याशी निवडणुकीशी संबंधित कुठलीही चर्चा झालेली नाही आणि होण्याची शक्यताही नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं. परंतु, 'पवारकाकां'च्या या खुलाशानंतर पुतणे अजित पवार यांनी वेगळंच मत मांडलं. राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि आता तर ते याबाबत अधिकच आग्रही दिसताहेत.

मोदी सरकारविरोधातील महाआघाडी भक्कम करायची असेल तर राज ठाकरे यांना सोबत घ्यावं लागेल. त्याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे आणि या संदर्भात आपण पुन्हा राज ठाकरेंना भेटून चर्चा करू, असं अजित पवार यांनी आज सांगितलं. कालच, दादरमधील एका मित्राच्या घरी अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. या बैठकीत मनसेचं 'इंजिन' महाआघाडीच्या दिशेनं निघालंय आणि त्याच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीही उत्सुक असल्याचे संकेतच अजित पवार यांच्या आजच्या विधानातून मिळत आहेत.दरम्यान, मनसेसोबत आघाडीशी शक्यता शरद पवारांनी फेटाळून लावल्यानंतरही, राज ठाकरेंना महाआघाडीत येण्याचं आवाहन अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी केलं होतं. 'प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही पाहिले असेलच. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र असे असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणे गरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत  यावे असे मला वाटते.''

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९