शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Jitendra Awhad : "हवेवर पोट भरणाऱ्या मशीनचा शोध..."; इंधन दरवाढीवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 2:18 PM

NCP Jitendra Awhad And Modi Government : जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे.

मुंबई - मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या पुढे गेले आहेत. बहुतांश राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत पेट्रोल पुन्हा एकदा ११५.०४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून, डिझेलच्या किमतीला शतक पूर्ण करण्यासाठी अवघे ७५ पैशांची वाढ होणे बाकी आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघून अमेरिकेतील एका वैज्ञानिकाने हवेवर पोट भरणाऱ्या मशीन्सचा शोध लावला आहे. भारतीय बाजारपेठेत लवकरच ती उपलब्ध करण्याची घोषणा त्याने न्यूयॉर्कमध्ये केली आहे" असं आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे विक्रमी १३७ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर, २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सातवेळा किमतीत वाढ करण्यात आली आहे.

सरकारने कमावले ३.३१ लाख कोटी

केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती राज्यानुसार बदलतात.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आठ दिवसामध्ये सातवेळा वाढ झाल्याने दिल्लीसह बहुतांश राज्यांच्या राजधानीत पेट्रोलच्या किमतीने १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे, तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ४.८० रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८० पैसे तर डिझेलमध्ये ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९१.४७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदीFuel Hikeइंधन दरवाढ