Maharashtra Politics: “शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 11:33 IST2023-01-26T11:32:30+5:302023-01-26T11:33:26+5:30

Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे.

ncp jitendra awhad replied prakash ambedkar over criticism over party chief sharad pawar | Maharashtra Politics: “शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड

Maharashtra Politics: “शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड

Maharashtra Politics: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, शिंदे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांवरही टीका केली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. याला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही

महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करत असल्याने विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो. पण, अजित पवार असे कुठे बोलले असतील वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते. मात्र, नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केले. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळले. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली, असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp jitendra awhad replied prakash ambedkar over criticism over party chief sharad pawar