Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:09 PM2021-05-24T19:09:41+5:302021-05-24T19:13:21+5:30

Tauktae Cyclone: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ncp eknath khadse says pm narendra modi did injustice to maharashtra on tauktae cyclone | Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Next
ठळक मुद्देएकनाथ खडसे यांची पंतप्रधान मोदींवर टीकाकेंद्राकडून राज्याला मदत मिळावी - खडसेआवश्यक औषधांचा पुरवठा झाला पाहिजे - खडसे

जळगाव: तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गोवा, गुजरात या राज्यांनाही जोरदार तडाखा दिला. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुजरातचा हवाई दौरा केल्याच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे. आता भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनीही यावरून पंतप्रधाननरेंद्र मोदींवर निशाणा साधत हा एकप्रकारे महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे म्हटले आहे. (ncp eknath khadse says pm narendra modi did injustice to maharashtra on tauktae cyclone)

तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरातमध्ये नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेचच पाहणी दौरा करत एक हजार कोटी रुपयांची मदत तिथे जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रात त्यांनी दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. हा महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्यायच आहे, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूक; ब्लॅक, व्हाइट, येलो फंगसवर डॉ. गुलेरियांचं महत्त्वाचं भाष्य

केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा

ज्याचे नुकसान होते, तो शेवटी देशाचा नागरिक आहे. त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. राज्यातील नागरिकांना मदत करणे, ही राज्याची जबाबदारी आहे. राज्य सरकार सध्या आढावा घेत आहे. त्यानंतर मदत करेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन मदतीची घोषणा करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे सांगत माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, महाराष्ट्राला शक्य तेवढी मदत लवकर करावी, असे एकनाथ खडसे म्हणाले. 

माऊंट एव्हरेस्टवर १०० जणांना कोरोनाची लागण? गाइडचा दावा, नेपाळ सरकारचा इन्कार

आवश्यक औषधांचा पुरवठा झाला पाहिजे

कोरोनासह सध्याच्या घडीला देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना अँफोटेरेसीन बी इंजेक्शनची गरज भासत आहे. या औषधासाठी परदेशातून कच्चा माल मागवावा लागतो. केंद्राकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील रुग्णांसाठी आवश्यक तो औषधांचा पुरवठा झाला पाहिजे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

“तुमचा कार्यकाळ संपू दे, मग तुरुंगातच पाठवतो”; टीएमसी खासदाराने राज्यपालांना धमकावले

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. २४ मे रोजी देशातील एकूण १८ राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे एकूण ५ हजार ४२४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच गुजरातमध्ये २ हजार १६५, महाराष्ट्रात १ हजार १८८, उत्तर प्रदेशात ६६३, मध्य प्रदेशात ५१९, हरियाणात ३३९ आणि आंध्र प्रदेशात २४८ म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. 
 

Web Title: ncp eknath khadse says pm narendra modi did injustice to maharashtra on tauktae cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.