आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:35 AM2024-06-10T07:35:29+5:302024-06-10T07:35:47+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope,10 June 2024 : There will be financial gain in job, honor will increase | आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल

आजचे राशीभविष्य, १० जून २०२४ : नोकरीत आर्थिक लाभ होईल, मान - सन्मान वाढेल

मेष -  आपल्या राशी पासून चंद्र चवथा असेल. आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल.  आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा असेल. आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा

मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र दुसरा असेल. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल.  आणखी वाचा

कर्क- आपल्या राशी पासून चंद्र प्रथम असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील.  आणखी वाचा

सिंह- आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका.  आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.  आणखी वाचा

तूळ- आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्‍यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. आणखी वाचा

वृश्चिक-  आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल.  आणखी वाचा

धनु- अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. आणखी वाचा

मकर- आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आणखी वाचा

कुंभ- आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील.  आणखी वाचा

मीन- आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope,10 June 2024 : There will be financial gain in job, honor will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app