शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:11 IST

Jay Ajit Pawar News: अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. ही सगळ्यांची इच्छा आहे, असे जय पवार म्हणाले.

Jay Ajit Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. महायुतीतील नेतेही पलटवार करत आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेत चित्र दिसावे, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असून, सत्ता कायम राखण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. यातच बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढली. आता तिथून निवडणूक लढवण्यात रस नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आता जय पवार बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. पत्रकारांशी बोलताना जय पवार यांनी यासंदर्भात स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी ठरवतील तसे, असे जय पवार यांनी म्हटले आहे. 

अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. जय पवार यांच्या नेतृत्वात बारामतीत मोठी रॅली काढण्यात आली. याबाबत बोलताना जय पवार म्हणाले की, यावेळेस रॅली चांगली झाली. जनसन्मान रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वेळी पाऊस होता. मात्र आता सगळे कव्हर केले आहे. जनतेचा प्रतिसादही मागील वेळेपेक्षा चांगला आहे. सगळ्यांना अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. ही सगळ्यांची इच्छा आहे, असे जय पवार म्हणाले. 

दरम्यान, माझी इच्छा ही अधीपासूनच सर्वांना मदत करण्याची आहे. अजित पवारांनी मतदारसंघात ज्या प्रकारे काम केले आहे. त्या प्रकारे लोकांचे कामे करायची आहेत. सर्व तरुणांचा पुढाकार आहे. सगळ्यांची इच्छा होती. युवक म्हणायचे की, दादा आता तुम्हीच नेक्स्ट. पण बघू. दादा आणि पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगत बारामती मतदारसंघातील उमेदवारीबाबत सकारात्मक विधान केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीbaramati-acबारामती