शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Maharashtra Political Crisis: “...तर आमच्या शुभेच्छाच”; राऊतांच्या वाढलेल्या ईडी कोठडीवरुन भुजबळांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 16:30 IST

Maharashtra Political Crisis: संजय राऊत यांच्यावरील मोठ्या ईडी कारवाईनंतरही शरद पवार गप्प का, असा प्रश्न छगन भुजबळांना विचारण्यात आला.

नाशिक: पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या  झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना अटक केली. न्यायलयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आता संजय राऊतांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही. जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच, असे सांगत, राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा. ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही. बांठीया कमिशनन ओबीसीची संख्या कमी दाखवली. अनेक त्रुटी आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.  ...तर आमच्या शुभेच्छाच

छगन भुजबळ यांना संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच, अशी मिश्किल टिपण्णी भुजबळ यांनी केली. तसेच छगन भुजबळ यांना संजय राऊतांवर शरद पवार गप्प का, अशी विचारणाही करण्यात आली. यावर बोलताना, असे काही नाही. लोकसभेत पण ईडीच्या कारवायांसंदर्भात राष्ट्रवादीकडून आवाज उठवला जातो. खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भूमिका मांडत असतात. अनेक विरोधी पक्षांनी हा कायदा राक्षसी असल्याचे म्हटले आहे. हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेला आहे. चिदंबरम यांनीच बनवलाय त्यामुळे भाजपला तरी काय ठेवणार? असे भुजबळ म्हणाले. 

थोडा पॉझ घ्यावा लागतोच, दोनच मंत्री आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, रात्री २ पर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे त्याची परिसीमा आहे. थोडा पॉझ घ्यावा लागतोच. दोनच मंत्री आहे, असा टोला लगावत, ५ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का, याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे ती कशी सुटते ते बघू, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी सुरू असताना, संजय राऊत यांनी ईडी कोठडीवर काही आरोपही केले आहेत. मला ह्रदयविकाराचा त्रास असूनही मला जिथे ठेवलेय तिथे व्हेंटिलेशन नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर, राऊत यांना एसी रुममध्ये ठेवलेय, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. संजय राऊत यांच्यावर सगळे आरोप जुनेच आहेत, यात नवीन काहीही नाही. तसेच, त्यांच्यावरील आरोप आणि ही कारवाई राजकीय हेतुने करण्यात आल्याचेही राऊतांचे वकील मनोज मोहिते यांनी न्यायालयात म्हटले आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळChhagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय