शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव चौकात राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 18:47 IST

सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांवर वार केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असतानाचं अचानक  शिवसेनेचे कार्यकर्तेही चौकाच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले.

पुणे : सामनाच्या अग्रलेखात अजित पवारांवर वार केल्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असतानाचं अचानक  शिवसेनेचे कार्यकर्तेही चौकाच्या विरुद्ध बाजूला उभे राहिले. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत कार्यकर्त्यांना रोखून धरल्याने पुढील अनर्थ टाळल्याचे दृश्य पुण्यात बघायला मिळाले.              शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिर बांधण्याविषयीचा इरादा बोलून दाखवला. त्यावर पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. पवार यांच्या त्या विधानाला आज प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले. यावेळी वापरण्यात आलेल्या भाषेवर आक्षेप घेत पुण्यातील अभिनव चौकात असलेल्या सामनाच्या कार्यालयाजवळ राष्ट्रवादीने आंदोलन केले. या आंदोलनाच्या दरम्यान सामनाचा अंकही जाळण्यात आला. त्याचवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही सामनाच्या कार्यालयाखाली समर्थनार्थ घोषणा दिल्या. 

अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक, 'सामना'चे अंक जाळले              शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की,अजित पवारांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्यांना त्याच पद्धतीचे उत्तर सामनामधून देण्यात आले. जो ज्या भाषेत बोलेल त्याच पद्धतीने उत्तर देण्याची शिवसेनेची स्टाईल आहे. यापुढेही ही स्टाईल कायम ठेवण्यात येईल.              राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, अत्यंत हीन दर्जाची भाषा सामनाच्या अग्रलेखात वापरण्यात आली आहे . ज्या पक्षाच्या प्रमुखांना कधी ग्रामपंचायतीची निवडणुकही लढवता आली नाही त्यांनी अशा पद्धतीने टीका करताना स्वतःची उंची बघायला हवी होती. अजित पवार काहीही चुकीचे बोललेले नाहीत, राज्यात दुष्काळ, बेकारीसारखे प्रश्न असताना त्यांनी राम मंदिराचा मुद्दा आणला आहे. 

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊत