“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:21 IST2025-09-26T18:19:41+5:302025-09-26T18:21:05+5:30
Chhagan Bhujbal News: सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal News: २८ तारखेला बीडमध्ये आमची रॅली आणि सभा होणार आहे. प्रकाश शेंडगे, धनंजय मुंडे यांच्यासह काही जण येणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असून, शेतकरी अडचणीत आले आहेत. ओबीसी समाजातील मुले जीवाचे बरे-वाईट करून घेत आहेत. परंतु, त्यांनी असे करू नये. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. आम्ही त्यात विजय मिळवणार, असे राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही सभा घेऊ. या लढाईत मागासवर्गीय समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचे संरक्षण आम्हाला करायचे आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
प्रचंड महासागर लोकांना दाखवूया जनतेचा. ओबीसीमधील वेगवेगळ्या समाजाचे जे नेते आहेत, ते आपआपल्या परीने सभा घेत आहेत. मोर्चे काढत आहेत. महात्मा फुले परिषदेतर्फे वेगवेगळ्या जिल्हांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे दिली जात आहेत आणि काही ठिकाणी लोक उपोषण करत आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक ओबीसींच्या हक्कासाठी बाहेर पडले आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.
दलित समाज, मागासवर्गीय, आदिवासी या समाजाचा आपल्याला पाठिंबा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरून दिलेल्या गोष्टी आहेत. ३४० अंतर्गत ओबीसीमधील छोट्या जातींना काही मदत केली असे स्पष्ट म्हटले आहे. ३४१ मध्येही त्यांनी याची मांडणी केली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील उपसमितीमध्ये छगन भुजबळ सदस्य आहेत. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते.