nawab malik support to sanjay raut said | राऊतांच्या समर्थनार्थ नवाब मलिक मैदानात, म्हणाले....

राऊतांच्या समर्थनार्थ नवाब मलिक मैदानात, म्हणाले....

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी खासदार भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी पत्रकारपरिषद घेत, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा जोरादर समाचार घेतला होता. त्यांनतर राऊत यांनी सुद्धा उदयनराजे यांना प्रतिउत्तर देताना तंगड्या तोडण्याची भाषा करून नका कारण तंगड्या प्रत्येकाला असतात असा टोला लगावला होता. तर राऊतांच्या या वक्तव्याच्या समर्थनार्थ नवाब मलिक मैदानात उतरले आहे.

देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गादीचे वारसदार आहेत. तसे रक्ताचे देखील आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशज असल्याचे पुराव्याबद्दल प्रश्न विचारला असेल तर त्यांनी त्याचे उत्तर द्यावे असे मलीक म्हणाले. तर कुणी कोणाच्या तंगड्या तोडू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, काही विषयांवरून काही जाणांनी वादाला तोंड फोडले. त्यामुळे आम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागली. तुम्ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक यांच्याबाबत काहीही बोलाल, हे कसे काय खपवून घेतले जाईल. आम्ही तुमचा आदर राखतो. तुम्हीही आमचा आदर राखा. देशात लोकशाही आहे, येथे तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही, असा टोलाही संजय राऊत उदयनराजेंना लगावला होता.


 


 

 

Web Title: nawab malik support to sanjay raut said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.