माजी मंत्री नवाब मलिकांच्या घरात गुडघाभर पाणी; शिवसनेने करून दाखवलं लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 09:48 IST2019-07-02T09:33:23+5:302019-07-02T09:48:36+5:30

मलिक यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या किचन आणि घरातील खोल्यांमध्ये पाणी साचलेले असल्याचे दिसत आहे.

 Nawab Malik party demonstrated by Shiv Sena | माजी मंत्री नवाब मलिकांच्या घरात गुडघाभर पाणी; शिवसनेने करून दाखवलं लगावला टोला

माजी मंत्री नवाब मलिकांच्या घरात गुडघाभर पाणी; शिवसनेने करून दाखवलं लगावला टोला

मुंबई - शहर आणि उपनगरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक भागात घरांमध्ये पाणी साचले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी साचले असून त्यांनी हे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले असून, 'शिवसनेने करून दाखवलं' असा टोला मलिकांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनके भागातील घरांमध्ये पाणी साचले असल्याचे चित्र आहे. नवाब मलिक यांच्या घरात सुद्धा पाणी साचले असून त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचे फोटो पोस्ट केली आहेत. आपल्या घरातील आणि घराबाहेर साचलेल्या पाण्याचे फोटो त्यांनी शेयर केली आहेत. सोबतच 'करून दाखवलं' असा टोला त्यांनी सेनेला लगावला आहे.

मलिक यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या किचन आणि घरातील खोल्यांमध्ये पाणी साचलेले असल्याचे दिसत आहे. तर एका फोटोत खुद्द मलिक हे गुडघाभर पाणी साचले असल्याचे दखवत आहे. याचवेळी मलिक यांनी 'धन्यवाद मुंबई महानगरपालिका' असे म्हंटले आहे

Web Title:  Nawab Malik party demonstrated by Shiv Sena