शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...ते अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे

By admin | Updated: June 18, 2014 04:41 IST

लापूर औद्योगिक संघटनेमार्फत चालविण्यात येणारे अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्या

मुंबई : बेलापूर औद्योगिक संघटनेमार्फत चालविण्यात येणारे अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्या, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी दिले. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे यासंदर्भात बैठक झाली. माजी खासदार संजीव नाईक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे, नवी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच ठाणे बेलापूर औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.ठाणे, नवी मुंबई पट्टयात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने होते. या बाबीचा विचार करून ठाणे, बेलापूर औद्योगिक संघटनेमार्फत अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले होते. ते केंद्र अधिक सक्षमपणे कार्यरत रहावे, यासाठी हे केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे. मात्र हस्तांतर करताना कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि इतर प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असे नाईक म्हणाले.इंधनावरील अधिभार काढावामहापालिका हद्दीत व्हॅट अधिभार लावल्यामुळे पेट्रोल, डिझेल महाग होत आहे. त्यामुळे हा अधिभार रद्द करावा, अशा सूचना गणेश नाईक यांनी अन्य एका बैठकीत दिले. या बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, विक्रीकर आयुक्त नितीन करीर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पेट्रोल डिझेल वितरक संघटनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. नवी मुंबईत बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाचा वापर प्रामुख्याने मुंबई, पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांमार्फत होतो. या ठिकाणी पेट्रोल डिझेलवर अधिभार लावल्यामुळे स्थानिक नागरिकांना पेट्रोल, डिझेल ४ रुपयांनी महाग मिळत आहे. (विशेष प्रतिनिधी)