शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावमध्ये आजपासून नाट्यसंमेलन

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

भव्य शामियाना : देवेंद्र फडणवीस, शरद पवार उपस्थित राहणार

बेळगाव : बेळगावनगरीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, ५० वर्षांनंतर होत असलेल्या नाट्य संमेलनाविषयी बेळगावकरांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सी.पी.एड्. मैदानावर भव्य व आकर्षक शामियाना उभारण्यात आला आहे. शनिवारी (दि. ७) नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. बेळगावमध्ये १९५६ मध्ये महाराष्ट्र राज्य संमेलन झाले होते. बेळगावमध्ये काही वर्षांपूर्वी नाटकांचे नेहमी प्रयोग होत होते. मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने नाटक कंपन्यांच्या वाहनांवर प्रवेशकर लादून नाटकाचे प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, अशी व्यवस्था केली. नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमांची मेजवानी मराठी भाषिकांना मिळाली आहे. शामियान्याची आसन क्षमता दहा हजार आहे. नाट्यसंमेलन स्थळाला ‘बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी’, असे नाव दिले असून, मुख्य मंचाला ‘स्मिता तळवलकर रंगमंच’ असे नाव दिले आहे. शामियान्यात वातानुकूलित रंगमंच उभारण्यात येत आहे. नाट्य संमेलनातील काही कार्यक्रम जिरगे सभागृह, लोकमान्य रंगमंदिर येथे होणार असून, त्यांना कुलदीप पवार, सदाशिव अमरापूरकर, नयनतारा, अशी नावे दिली आहेत. शुक्रवारी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० यावेळेत गानरंग, भारूड, नृत्यरंग, गीतरामायण आणि प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. वंदना गुप्ते यांना जीवन गौरव पुरस्कारनाट्य संमेलनाच्या निमित्ताने गोगटे फौंडेशन तर्फे दरवर्षी निवडण्यात येणाऱ्या नाटकाला वा कलाकाराला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार नाट्यक्षेत्रात ४४ वर्षे कार्यरत असणाऱ्या वंदना गुप्ते यांना नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (दि. ७) खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली ३ ते ४ सदस्यीय निवड समिती नेमण्यात येईल. समितीच्या अहवालानुसार गोगटे फौंडेशन पुढील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करेल. वंदना गुप्ते यांना जीवन गौरव पुरस्कारनाट्य संमेलनाच्या निमित्ताने गोगटे फौंडेशन तर्फे दरवर्षी निवडण्यात येणाऱ्या नाटकाला वा कलाकाराला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार नाट्यक्षेत्रात ४४ वर्षे कार्यरत असणाऱ्या वंदना गुप्ते यांना नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (दि. ७) खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली ३ ते ४ सदस्यीय निवड समिती नेमण्यात येईल. समितीच्या अहवालानुसार गोगटे फौंडेशन पुढील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करेल.