शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सुप्रिया सुळे यांच्यासमोर राष्ट्रवादीमधील गटबाजीची गाऱ्हाणी

By admin | Updated: October 7, 2016 20:35 IST

पक्षात अनेक निष्क्रिय आहेत त्यांची हकालपट्टी करा, सध्याच्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही... पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलतात

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि.07 -  पक्षात अनेक निष्क्रिय आहेत त्यांची हकालपट्टी करा, सध्याच्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही... पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलतात..., अशा अनेक तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आदींनी बैठकीत केल्या. सुळे यांनी सकाळी ९.३० वाजेपासून पक्षाच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयामध्ये बैठकांना सुरुवात केली. त्यात सुरुवातीला शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी व शेवटी महिला आघाडीमधील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे, तक्रारी सुळे यांनी ऐकून घेतले. या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काही लोक डावलतातपक्षाच्या कार्यक्रम किंवा विविध उपक्रमांमध्ये काही लोक जाणीवपूर्वक डावलतात. वरिष्ठांकडे चुकीचे रिपोर्टिंग करतात. हा प्रकार चुकीचा आहे. नेत्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी भुसावळचे उमेश नेमाडे यांनी केली. नव्यांनी आम्हाला शिकवू नये...राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे..., पवार काय आहेत हे आम्हाला नव्यांनी शिकवू नये. विजया पाटील यांना विचारावे की त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आहे का, पक्षातील अनेकांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. माजी खासदार वसंतराव मोरे यांना विचारले जात नाही. जे काम करीत नाही त्यांची हकालपट्टी करा. मी दादा, पवार साहेबांना याची माहिती दिली होती. बॅनर तयार होतात, पण ते फक्त व्हॉट्स अ‍ॅपवर फिरतात. चमकोगिरी बंद व्हावी, अशा तक्रारी संजय पवार यांनी केल्या. मोठे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारत नाहीमी बसचालक होतो... मला चोपडा भागात काम करताना कोण निवडून येईल याची माहिती होती. चंद्रकांत बारेला यांना उमेदवारीची मागणी नागरिक करीत होते. ही बाब मी वरिष्ठांच्या कानावर घातली. पण मोठे पदाधिकारी सामान्य कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत, अशी तक्रार एका कार्यकर्त्याने केली. सर्वांनी शिष्टाचार पाळावा - सुप्रिया सुळेकार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यावर सुप्रिया सुळे यांनी काही सूचना केल्या. त्यात मंत्री असो किंवा कुणीही त्यांनी जिल्ह्यात येताना जिल्हाध्यक्षांना कळवावे. जिल्हाध्यक्ष संबंधित तालुक्यात प्रमुख असतो. या सर्व तक्रारींची माहिती प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घालीन. शिष्टाचार सर्वांनी पाळावा, अशी ताकीदही सुळे यांनी दिली.