शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या शासकीय वसतिगृहातील औरंगाबादच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 16:23 IST

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.23) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती़

ठळक मुद्दे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनी ; नर्सिंगचे शिक्षण प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज ; मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद

नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.23) गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक - पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ समाजकल्याण विभागाचे विभागीय कार्यालय आहे़ या कार्यालयाजवळच मुलींचे वसतीगृह असून या ठिकाणी गौरी जाधव ही विद्यार्थिनी राहत होती़ नाशिक शहरातील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या गौरीने दुपारच्या सुमारास वसतीगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ मुंबई नाका पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली़ 

मुंबई नाका पोलीस शासकीय वसतीगृहात पोहोचल्यानंतर त्यांनी गौरीने आत्महत्या केलेल्या खोलीची तपासणी केली़ गौरीने आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे़

दरम्यान, गौरी जाधवच्या आत्महत्येचे खरे कारण पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीDeathमृत्यूPoliceपोलिसCrimeगुन्हा