शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदीच जबाबदार!

By admin | Updated: February 11, 2015 08:36 IST

जनतेला कोणीही गृहीत धरू नये. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीतील निकालातून दिसून आले. दिल्लीकरांनी आमिषांना बळी न पडता मतदान केले, अशा डागण्या देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पराभवास पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : जनतेला कोणीही गृहीत धरू नये. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीतील निकालातून दिसून आले. दिल्लीकरांनी आमिषांना बळी न पडता मतदान केले, अशा डागण्या देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पराभवास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीला जबाबदार धरले.दिल्लीतील निकालाचा कौल लक्षात येताच अत्यंत चपळाईने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. दिल्लीत झालेल्या भाजपाच्या दारुण पराभवाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. ते म्हणाले, दिल्लीतील जनतेने नवख्या आम आदमी पक्षाला ‘झाडून’ मतदान केले. या यशाबद्दल मी केजरीवाल यांचे फोन करून अभिनंदन केले. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत.दिल्लीतील पराभवास किरण बेदी नव्हे, तर मोदीच जबाबदार आहेत, या अण्णा हजारेंच्या मताशी आपण सहमत असल्याचेही उद्धव यांनी सांगून टाकले! दिल्लीकर जनतेने ‘आमिषा’ला (अमित शहा यांचा पुसटसा उल्लेख करीत) बळी न पडता मतदान केले, असा मार्मिक टोला लगावत दिल्लीकर जनतेने दिल्लीश्वरांना दिलेला हा इशारा आहे, असे सांगून उद्धव यांनी मोदींकडे बोट दाखवले. भगवे झेंडे फडकले! उद्धव यांची पत्रपरिषद चालू असतानाच शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन शिवालयावर दाखल झाले. त्यांनी आपले निशाण फडकावून भाजपाला एक प्रकरे डिवचण्याचेच काम केले.