nanded Congress Mla Raosaheb Antapurkar Dies due to Of Covid 19 | नांदेडचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन

नांदेडचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई: नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सुरुवातीला नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. मुंबई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचं निधन झालं.रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. अंतापूरकर यांच्या निधनानंतर चव्हाण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 'माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना', असं चव्हाण यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nanded Congress Mla Raosaheb Antapurkar Dies due to Of Covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.