Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 07:51 IST2022-06-24T07:51:02+5:302022-06-24T07:51:48+5:30

Nana Patole: निधीवाटपाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिला, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी गुरुवारी केला. मात्र, अजित पवार यांनी नंतरच्या पत्रपरिषदेत आरोपाचा इन्कार केला.

Nana Patole: Ajit Pawar also harassed Congress MLAs in allocating funds, Nana Patole alleges | Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : निधीवाटपाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिला, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी गुरुवारी केला. मात्र, अजित पवार यांनी नंतरच्या पत्रपरिषदेत आरोपाचा इन्कार केला.
पटोले म्हणाले की, आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमातून पुढे आले. सरकार जनतेसाठी काम करेल, हा विचार होता. वित्त खाते राष्ट्रवादीकडे आहे. अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचे समोर येत होते. शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे, या तक्रारी होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास होता. तसेच मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नव्हता. तर अजित पवार म्हणाले की, दुजाभाव मी कधीही केला नाही. आधीच ते बोलले असते तर गैरसमज दूर करता आले असते. विकासकामात मी नेहमीच मदतीची भूमिका घेतली. एखाद्या ठिकाणी आमदार एका पक्षाचा आणि नगरपालिका दुसऱ्या पक्षाच्या हाती असेल तर कदाचित निधीवाटपात भेदभावाचा आरोप होऊ शकतो.

Web Title: Nana Patole: Ajit Pawar also harassed Congress MLAs in allocating funds, Nana Patole alleges