Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:28 IST2026-04-07T13:26:30+5:302026-04-07T13:28:12+5:30

Nagpur Fake Godman Rapes Woman:  नाशिक आणि वसईच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला.

Nagpur Shocker: Fake Godman Rapes Woman After Promising to Return Her Missing Husband; Arrested | Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

नाशिक आणि वसईच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. बेपत्ता पतीला परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केला आहे. पीडित महिलेचा पती गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होता, त्याला तंत्र-मंत्राच्या जोरावर परत आणण्याचे खोटे आश्वासन या नराधमाने दिले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने भोंदूबाबाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी ताबडतोब भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून नागरिकांना अशा भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती गेल्या काही महिन्यांपूर्वी अचानक घरातून बेपत्ता झाला. तेव्हापासून पतीचा शोध घेण्यासाठी ती महिला सर्वतोपरी प्रयत्न करत होती. याच काळात तिचा संपर्क आरोपीशी झाला. आरोपीने महिलेला विश्वासात घेतले आणि तंत्र-मंत्राद्वारे तिच्या बेपत्ता पतीला शोधून काढेल आणि त्याला पुन्हा घरी परत आणेल, असे अश्वासन दिले. पतीने घरी परत यावे, या आशेने पीडित महिला आरोपीच्या सांगण्याप्रमाणे वागू लागली. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन आरोपीने विधी आणि पूजेच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यासोबत घडलेला सर्वप्रकार पोलिसांच्या कानावर घातला. 

पोलीस तपास सुरू

पीडित महिलेच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल केला आणि संबंधित ढोंगी बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून, या आरोपीने अशाच प्रकारे इतरही कोणाची फसवणूक केली आहे का? याचा शोध घेतला जात आहे. तसेच अशा कोणत्याही भोंदू बाबांच्या किंवा तंत्र-मंत्राच्या भूलथापांना बळी पडू नका. संकटकाळात अंधश्रद्धेचा आधार घेण्याऐवजी कायदेशीर मार्गांचा अवलंब करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहेत.

Web Title : नागपुर: ढोंगी बाबा ने अनुष्ठान के बहाने महिला से किया बलात्कार, गिरफ्तार

Web Summary : समान घटनाओं के बाद, नागपुर में एक ढोंगी बाबा ने लापता पति को ढूंढने का वादा करके एक महिला से बलात्कार किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया, ऐसे धोखाधड़ी वाले कृत्यों के खिलाफ सावधानी बरतने और कानूनी सहारा लेने की सलाह दी।

Web Title : Nagpur: Fake Baba Rapes Woman Under Pretext of Rituals, Arrested

Web Summary : Following similar incidents, a Nagpur woman was raped by a fake baba promising to find her missing husband. Police arrested the accused, urging caution against such fraudulent practices and advising legal recourse.