Nagar Panchayat Election Result 2022: सर्वाधिक नगरपंचायतीत राष्ट्रवादी; भाजपची जाेरदार मुसंडी; काँग्रेसला चांगलं यश, शिवसेना चौथ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:26 AM2022-01-20T07:26:16+5:302022-01-20T07:26:25+5:30

तरुण चेहऱ्यांना मिळाली संधी; काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का; महाविकास आघाडीला राज्यात सर्वाधिक जागा

Nagar Panchayat Election Result 2022 NCP wons most Nagar Panchayats BJP gives significant performance | Nagar Panchayat Election Result 2022: सर्वाधिक नगरपंचायतीत राष्ट्रवादी; भाजपची जाेरदार मुसंडी; काँग्रेसला चांगलं यश, शिवसेना चौथ्या स्थानी

Nagar Panchayat Election Result 2022: सर्वाधिक नगरपंचायतीत राष्ट्रवादी; भाजपची जाेरदार मुसंडी; काँग्रेसला चांगलं यश, शिवसेना चौथ्या स्थानी

Next

मुंबई : निमशहरी महाराष्ट्राचा भाग असलेल्या राज्यातील १०६ नगर पंचायतींपैकी ९७ पंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविले. मात्र भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला तुलनेने फटका बसला आणि तो पक्ष तिसऱ्या क्रमांकावर तर मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर फेकली गेली.

भाजपने २२, काँग्रेस २१ तर शिवसेनेने १७ नगर पंचायतींवर झेंडा फडकविला आहे. सर्वाधिक ३८४ जागा भाजपने जिंकल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीने ३४४, शिवसेनेने २८४ तर काँग्रेसने ३१६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे.
भंडारा जि.प.मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या. तेथे भाजपला फटका बसला. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सरशी झाली. अपक्ष, स्थानिक आघाड्या, इतर लहान पक्षांनी १६ नगर पंचायतींमध्ये सत्ता संपादन केली. बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केज वगळता चार ठिकाणी पॅनल उभे केले होते. त्यात तीन पंचायतींत सत्ता मिळविली असून, मंत्री धनंजय मुंडे गटाला धक्का बसला आहे.

मिस यू आबा... 
रोहित पाटील गहिवरले
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकवत दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली. या विजयानंतर आर. आर. आबांच्या आठवणींनी रोहित यांना गहिवरून आले. आबांना नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल, असे सांगत रोहित यांनी मतदारांचे आभार मानले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात, ‘निवडणूक निकालानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही’,‘मी आता २३ वर्षांचा आहे, पंचवीशीचा होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवणार नाही,’ असे सांगत भावनिक सादही त्यांनी घातली होती. त्यावर विरोधकांनी त्यांना बालिश म्हणत हिणवले होते.

विजयाचे शिलेदार
अर्धापूर : अशोक चव्हाण
तिवसा : यशोमती ठाकूर
घनसावंगी : राजेश टोपे
सिंदेवाही : विजय वडेट्टीवार
सोयगाव : अब्दुल सत्तार
म्हसळा : सुनील तटकरे
पोंभुर्णा : सुधीर मुनगंटीवार
कवठे महांकाळ : रोहित पाटील
कर्जत : रोहित पवार
कडेगाव : संग्राम देशमुख
देहू : सुनील शेळके
पाटण : सत्यजित पाटणकर
संग्रामपूर : बच्चू कडू
दोडामार्ग, वैभववाडी : नीतेश राणे
कोरेगाव : महेश शिंदे
बोदवड : चंद्रकांत पाटील
आष्टी पाटोदा : सुरेश धस
माळशिरस :   मेहिते पाटील

दिग्गजांना धक्का
रावसाहेब दानवे 
धनंजय मुंडे 
शशिकांत शिंदे 
गोपीचंद पडळकर
संजयकाका पाटील
प्रा. राम शिंदे 
ॲड. के. सी. पाडवी 
रजनी पाटील
संभाजी निलंगेकर 
जयंत पाटील 
एकनाथ खडसे
रामदास कदम 
शंभूराज देसाई 
विश्वजित कदम

विदर्भात महाआघाडी सरस : अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये १२ नगरपंचायतीमध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली वगळता महाआघाडी सरस राहिली. अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतीत यशोमती ठाकूर यांनी एकहाती वर्चस्व राखले, तर भातकुली नगरपंचायतीत आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पक्षाने १७ पैकी ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले.

Web Title: Nagar Panchayat Election Result 2022 NCP wons most Nagar Panchayats BJP gives significant performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app