शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्याा पत्नी नफिसा बेगम यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:27 IST2026-02-17T09:26:23+5:302026-02-17T09:27:10+5:30

Abdul Sattar Wife passes away: शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन झालं आहे. सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा असलेल्या नफिसा बेगम यांच्या आकस्मिक निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Nafisa Begum, wife of senior Shiv Sena leader Abdul Sattar, passes away | शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्याा पत्नी नफिसा बेगम यांचं निधन 

शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्याा पत्नी नफिसा बेगम यांचं निधन 

शिंदेसेनेचे सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन झालं आहे. सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा असलेल्या नफिसा बेगम यांच्या आकस्मिक निधनामुळे सत्तार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर आज दफनविधी होणार आहेत. 

अब्दुल सत्तार यांनी सुरुवातीला काँग्रेस आणि गेल्या काही वर्षांपासून शिंदेसेनेमधून सिल्लोडची आमदारकी भूषवली आहे. मध्यंतरीच्या काही काळात ते मंत्रिपदीही होते. तर सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम या सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या. तसेच त्यांनी काही काळ सिल्लोडचं नगराध्यक्षपदही भूषवलं होतं. दरम्यान, त्यांच्या अकाली जाण्यामुळे सत्तार कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. तसेच नफिसा बेगम यांच्या दफनविधीसाठी शिंदेसेना आणि राज्य सरकारमधील नेतेमंडळी सिल्लोड येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

Web Title : अब्दुल सत्तार की पत्नी नफीसा बेगम का निधन

Web Summary : शिवसेना विधायक अब्दुल सत्तार की पत्नी नफीसा बेगम का निधन हो गया। सिल्लोड की पूर्व नगरसेविका के आकस्मिक निधन से सत्तार परिवार में शोक की लहर है। उनका अंतिम संस्कार आज सिल्लोड में होगा, जिसमें राजनीतिक नेताओं के शामिल होने की उम्मीद है।

Web Title : Abdul Sattar's Wife, Nafisa Begum, Passes Away

Web Summary : Nafisa Begum, wife of Shiv Sena MLA Abdul Sattar, passed away. The former Sillod corporator's sudden demise has deeply saddened the Sattar family. Her funeral will be held today in Sillod, with political leaders expected to attend.