माझ्या भावाला डॉ दाभोलकर हत्याप्रकरणी गोवण्यात आले : प्रवीण अंदुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:40 IST2018-08-19T17:37:54+5:302018-08-19T17:40:57+5:30

माझ्या भावाचा डॉ दाभोलकर यांच्या हत्येशी काहीही संबंध नसून त्याला यात गोवण्यात आले असल्याचा आरोप सचिन अणदूरे यांचा भाऊ प्रवीण अंदुरे याने केला.

My brother was not involve in Dr Dabholkar murder :Pravin Andure | माझ्या भावाला डॉ दाभोलकर हत्याप्रकरणी गोवण्यात आले : प्रवीण अंदुरे

माझ्या भावाला डॉ दाभोलकर हत्याप्रकरणी गोवण्यात आले : प्रवीण अंदुरे

पुणे :माझ्या भावाचा डॉ दाभोलकर यांच्या हत्येशी काहीही संबंध नसून त्याला यात गोवण्यात आले असल्याचा आरोप सचिन अंदुरे यांचा भाऊ प्रवीण अंदुरे याने केला. सचिन अणदूरे याला डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपात सीबीआय पोलिसांनी अटक केली असून आज कोर्टात हजर करण्यात आले. प्रथम न्याय दंडाधिकारी ए एस मुजुमदार यांनी  आरोपीला 7 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

      यावेळी प्रवीण अंदुरे म्हणाले की, माझा भाऊ असं काहीही करणार नाही.तो सुशिक्षित असून त्याचा कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंध नाही.त्याला या प्रकरणात गोवले आहे.तो अत्यंत इमानदार आहे.यावेळी प्रवीण यांनी औरंगाबादमध्ये आमचे कुटुंब राहते.सचिनच्या घरात तो पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीसोबत राहतो अशी माहिती दिली. तो बी कॉम शिकला असून एका कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. तर त्याचा भाऊ प्रवीण पेट्रोल पंपावर काम करतो. 

प्रवीण अंदुरे म्हणाले की, 

मी २००६पासून त्याच्यासोबत राहत नाही. 

सचिनचा शारीरिक छळ करून त्याला अडकवले आहे.त्याचे कोणतेही पोलीस रेकॉर्ड नाही. 

तो कुठेही गेलेला नाही, त्याने असं काहीही केलेलं नाही. 

तो अत्यंत प्रामाणिक असून, पूर्ण निर्व्यसनी आहे. 

Web Title: My brother was not involve in Dr Dabholkar murder :Pravin Andure