MVA Mumbai Maha Morcha Video : अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 10:59 AM2022-12-17T10:59:23+5:302022-12-17T10:59:58+5:30

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे. परंतू वस्तुस्थिती काही औरच आहे.

MVA Mumbai Maha Morcha : womens from Maha Morcha do not know why they came for; Watch the video... | MVA Mumbai Maha Morcha Video : अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा व्हिडीओ...

MVA Mumbai Maha Morcha Video : अरे बापरे! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात; पहा व्हिडीओ...

googlenewsNext

मुंबईत आज मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापणार आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला थोड्याच वेळता सुरुवात होणार आहे. तर भाजपादेखील या मोर्चाला प्रत्यूत्तर म्हणून मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करणार आहे. अशातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे. 

MVA Mumbai Morcha & BJP's 'Maafi Maango' Protest Live: ठाणे बंद, आंदोलन काय करताय, शिवरायांच्या अपमानावरती महाराष्ट्र बंद करायला हवा होता : संजय राऊत

या महिलांशी लोकमतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी या महिलांनी आपल्याला मोर्चा कसला आहे ते माहिती नाही असे सांगितले. तसेच आम्हाला तुम्हाला आमच्यासोबत यायचे आहे, असे सांगितले गेले. राजूभाई आम्हाला इथे घेऊन आला आहे, असे या महिलांनी सांगितले. या महिलांच्या हाती मोर्चाचे बॅनर होते, त्यावर विचारले असता काहीनी आपण अंगठछाप असल्याचे सांगितले. पहा व्हिडीओ...

महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन केले जाणार आहे.  हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसाठी हा मोर्चा निघणार असून पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईभर ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. 

या आंदोलनात जागोजागी ‘उद्धव ठाकरे माफी मागा, नाना पटोले माफी मागा, अजित पवार माफी मागा,’ असे फलक झळकावण्यात येणार आहेत. तसेच काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.
 

Web Title: MVA Mumbai Maha Morcha : womens from Maha Morcha do not know why they came for; Watch the video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.