शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

Mutha canal : रहिवासी म्हणतात उंदीर घुशी नाही तर 'या' कारणामुळे फुटला मुठा कालवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 21:00 IST

गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे.

पुणे : गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेचे दुर्लक्ष, पाटबंधारे विभागाचा बेजबाबदारपणा यांच्यासोबत कालव्याची भिंतींमध्ये टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

         याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दांडेकर पूल, सिंहगड रस्ता भागात मुठा कालवा फुटून ३०० पेक्षा अधिक झोपड्यांमध्ये पाणी शिरले. या पाण्यात स्थानिकांचे संसार  वाहून गेले आहेत. यात अनेकांनी आयुष्यभर महत प्रयत्नाने गोळा केलेल्या पुंजीलाही तिलांजली मिळाली. त्यामुळे सर्वस्व हरवून बसलेल्या नागरिकांच्या डोळ्यातले पाणी आटायला तयार नाही. 

             या आपत्तीमागे कालव्याला गळती होत असूनही महापालिकेचे दुर्लक्ष आणि पाटबंधारे विभागाचा अक्षम्य बेजाबदारपणा यामुळे त्रास मात्र निष्पाप नागरिकांना भोगावा लागत आहे. यापैकीच एक कारण म्हणजे ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले त्या ठिकाणी मातीच्या भिंतीत एक- दोन नव्हे तर तब्बल सहा केबल टाकण्यात आल्या आहेत. यातील दोन खासगी कंपनीच्या आहेत. गंभीर बाब म्हणजे कालव्याची भिंत खोदून या केबल टाकल्याचे दिसून आले. कालव्याच्या पाण्यापासून तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे केबल टाकण्यासाठी भिंत खोदण्यात आली आणि त्यामुळे ही घटना घडल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाDamधरणfloodपूर