शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे..भाजपमधील बहुजनांचा आवाज

By admin | Updated: June 4, 2014 01:15 IST

भाजपमधील बहुजन समाजातील सच्चे कार्यकर्ते आणि नेत्यांचा गोपीनाथ मुंडे हे आधार होते. अडीअडचणींच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची सवय कार्यकर्त्यांंंंंना प्रोत्साहन आणि उत्साह

विनोद गुडधे पाटीलनागपूर: भाजपमधील बहुजन समाजातील सच्चे कार्यकर्ते आणि नेत्यांचा गोपीनाथ मुंडे हे आधार होते. अडीअडचणींच्या काळात  मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची सवय कार्यकर्त्यांंंंंना प्रोत्साहन आणि उत्साह निर्माण करणारी होती. सकाळी त्यांच्या निधनाची  बातमी कळली तेंव्हा विश्‍वासच बसत नव्हता. तत्त्काळ टीव्ही सुरू केला. दुर्दैवाने बातमी खरी होती. मुंडेंच्या अशा अकाली  जाण्याचा धक्काच बसला. भारतीय जनता पक्षाला बहुजनांचा चेहरा देणारा नेता हरपल्याचे अतीव दु:ख झाले. भाजप हा  भट-ब्राह्मणांचा पक्ष अशी प्रतिमा असण्याच्या काळात माझ्यासह राज्यातील इतरही भागातील जे काही बहुजन समाजातील  कार्यकर्ते या पक्षाच्या वाढीसाठी झटत होते त्यापैकीच एक मुंडे होते. पहिल्याच भेटीत आपलसं करण्याची शैली त्यांच्याकडे होती.  १९८0 मध्ये मुंबईतील बांद्रा येथे त्यांची आणि माझी प्रथम भेट झाली त्यानंतर सलग दहा वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी  मिळाली. पहिल्या भेटीतच त्यांनी  मला आपलसं केलं. मी प्रथम नगरसेवक झालो तेंव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्यासोबत  विधिमंडळातही काम करण्याची संधी मिळाली. विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना सर्वांंंंंना सोबत घेऊन  जाण्याची शैली  वाखणण्याजोगी होती. युतीची सत्ता आल्यावर ते उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे गृह खाते होते. आमदारांना स्वसंरक्षणासाठी  त्यांनी रिव्हॉल्व्हर देण्याचा प्रस्ताव होता. मात्र मला शस्त्र परवाना नाकारण्यात आला. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. इतरांना  परवाने देता व मला का नाही, असे मी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले ‘‘ विनोद तुझा स्वभाव तापट आहे आणि म्हणून मी तुला  परवाना देणार नाही’’ सुरुवातीला मुंडेंचा हा तर्क पटला नाही. पण कालांतराने अशा  काही घटना घडल्या की त्यांनी घेतलेला  निर्णय किती योग्य होता याची खात्री पटली. त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय यातून आला.