शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मालवणी भाषा टिकवण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रयत्नशील - सुहास पेडणेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 3:04 AM

मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले.

मुंबई  - मुंबई विद्यापीठाने मालवणी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश केला. या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात रविवारी दिले.रविवारी सकाळी दादर येथील नायर सभागृहात मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राच्या सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. पेडणेकर यांनी सांगितले की, कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सिंधुदुर्ग दौरा केला होता, त्यानंतर तेथे विद्यापीठाने महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. येथील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस)चे विद्यार्थी आणि जलदूत राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम तेथे राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यानंतर लवकरच हा प्रकल्प रायगड आणि पालघर येथे राबविण्यात येणार आहे. मालवणी तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता झाराप येथे २५ एकरांत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून, आपल्या मातीत राहून ही पिढी भूमीला अधिक वृद्धिंगत करेल. या वेळी कुलगुरूंनी अस्सल मालवणी भाषेत उपस्थितांशी संवाद साधला.

या वेळी उद्घाटन समारंभात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मालवणी भाषेत सांगितले की, मालवणी भाषा टिकायला हवी. त्यासाठी आपणास संवाद वाढवायला हवा. अजूनही घरात या भाषेतून संवाद होतो. त्यामुळे त्याचा न्यूनगंड न बाळगता ही भाषा टिकायला हवी़ त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अखेरीस मालवणी माणूस महापौर असल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना चहासाठी महापौर बंगल्यावर येण्याचे आवाहनही केले. या उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे मावळते अध्यक्ष ज्येष्ठ मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर, संमेलाध्यक्ष प्रभाकर भोगले, मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि कार्याध्यक्ष सतीश लळीत, अभिनेता अनिल गवस उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते अनिल गवस यांनी सांगितले की, मालवणी माणसांकडे प्रचंड गुणवत्ता आहे़ केवळ आपल्या माणसांशी न भांडता ती ऊर्जा कामाप्रति वापरली पाहिजे. मावळते संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या स्मृतींना उजाळा दिला़संमेलनाच्या माध्यमातून भाषा संवर्धनाला मिळेल गती

मालवणी भाषेची तशी काळजी करायची गरज नाही, कारण जोवर मालवणी बोलीभाषा घरोघरी नांदतेय तोवर तिला मरण नाही. तिचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे या प्रक्रियेकरिता अधिकाधिक माहितीची देवाण-घेवाण झाली पाहिजे. अशा संमेलनाच्या माध्यमातून या प्रक्रियेला अधिक गती मिळेल ही आशा आहे.- प्रभाकर भोगले, संमेलनाध्यक्ष

टॅग्स :marathiमराठीMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग