मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा थेट फटका मुंबई व ठाण्यातील दूध पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबई, ठाणे परिसरात सुमारे ५० टक्के दूध पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांतून मुंबई, पनवेलमार्गे ठाणे, मुंबईत येणारे सुमारे ५० टक्के दूध वाहतूक करणारे ट्रक आणि टँकर महामार्गावरच अडकल्याने शहरातील दूध वितरण विस्कळीत झाले आहे.
दूध विक्रेते कल्याणकारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले की, रोज १०० टक्के दूधपुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना उद्या फक्त ५० टक्केच दूध द्यावे लागणार आहे. ठाण्यात घरोगरी दूधपुरवठा करणारे सुमारे १००० विक्रेते, दुकाने, चहाविक्रेते आणि हॉटेल यांना याचा फटका बसेल. तर काही ठिकाणी ‘आज दूध नाही’ असे फलक लागण्याचीही शक्यता आहे.
भाज्याही अडकल्या
वाहतूक कोंडीत भाजीपाल्याची १०० वाहने अडकल्यामुळे पहाटे चार पर्यंत मुंबई बाजार समितीत पोहचणारी वाहने दुपारी १२ ते सायंकाळी चारपर्यंत पोहचली. भाजीपाला मार्केटमधील व्यवहार पहाटेपर्यंत पूर्ण होतात. आवक उशीरा झाल्याने जवळपास ६०० टन भाजीपाल्याची विक्री झाली नाही, असे भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले. फळ मार्केट मधील आवकही घटली आहे. स्ट्रॉबेरी, कलिंगड, अननस व पपईची ९० टक्के वाहने अडकली, असे संजय पानसरे (संचालक फळ मार्केट) यांनी सांगितले. तर एपीएमसीत पुणे जिल्ह्यातून येणारी कांद्याचे ट्रक टेम्पो लोणावळा परिसरात अडकले. यामुळे व्यापारावर परिणाम झाल्याचे कांदा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज म्हणाले.
Web Summary : Mumbai-Pune Expressway traffic snarls disrupt milk and vegetable supplies to Mumbai and Thane. Milk supply may drop 50%. Vegetable and fruit deliveries delayed, unsold. Onion trucks stuck, impacting trade. Prices likely to rise.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर यातायात जाम से मुंबई और ठाणे में दूध और सब्जी की आपूर्ति बाधित। दूध की आपूर्ति 50% तक गिरने की आशंका। सब्जी और फलों की डिलीवरी में देरी, माल नहीं बिका। प्याज के ट्रक फंसे, व्यापार प्रभावित। कीमतें बढ़ने की आशंका।