शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - नाशिक महामार्ग ठप्प

By admin | Updated: July 31, 2014 04:06 IST

मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे व महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती.

कसारा : मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे व महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती.बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कसारा घाटात दरड कोसळली होती. ही घटना इतकी भयानक होती की, संपूर्ण दरड घाटातील रस्त्यावर पसरली होती. बिबळवाडी वळणावर दगड, माती, असलेली महाकाय दरड नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोवर कोसळली़ सुदैवाने टेम्पोचालकाने उडी मारल्याने तो बचावला. सकाळी ८ वाजता दरड कोसळल्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यशवंत सोलसे, अक्षय सोनवणे, के. जी. घोसाळकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली. दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने महामार्गावरील नवीन कसारा घाटातील वाहतूक बंद करून जुन्या कसारा घाटमार्गे वळवण्यात आली़दरम्यान, मुसळधार पाऊस असल्याने नवीन कसारा घाटातील दरड हटवण्यात व्यत्यय येत होता. गॅमन इंडिया या ठेकेदार कंपनीकडे जेसीबी, क्रेन, डम्पर यासारख्या आपत्कालीन योजनेचे साहित्य उपलब्ध नसल्याने पोलिसांनी खासगी क्रेन व जेसीबी बोलवून दरड हटवण्याचे काम सुरू केले. नवीन घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू असतानाच जुन्या घाटात अप-डाऊन एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्याच वेळी मुंबई-नाशिक मार्गावर जुन्या कसारा घाटातही महाकाय वृक्ष व दरड एका ट्रेलरवर पडल्याने जुन्या घाटातील वाहतूकही सुमारे एक तास ठप्प झाली होती. सकाळी ८ पासून दुपारी १२ वाजेपर्यंत कसारा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. कसारा पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी आपल्या २५ कर्मचाऱ्यांसह वाहतूक सुरळीत करण्याचे व दरड हटवण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने करत होते. दुपारी १२.३० च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, महामार्गाचा ठेका घेतलेल्या गॅमन इंडिया या कंपनीने कसारा घाटात कुठल्याही प्रकारची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित न केल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. (प्रतिनिधी)