जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:47 IST2025-05-19T09:03:10+5:302025-05-19T09:47:59+5:30

Mumbai Goa Highway Car Accident Today: मुंबईहून देवरुखला अंत्ययात्रेसाठी जात असलेल्या प्रवाशांची कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली.

Mumbai Goa Highway Car Accident Today: The Jagbudi river has become black again! A car carrying passengers going to a funeral fell into the river; 5 people died | जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना आज पहाटे हा अपघात झाला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर (२२), मिताली विवेक मोरे (४५) , निहार विवेक मोरे (१९), श्रेयस राजेंद्र सावंत (२३) या पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.

दोन्ही कुटुंबे मुंबई मिरा रोड भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास देवरूख येथे जात होते. भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली. ही भीषण दुर्दैवी घटना पहाटे पाच ते साडेपाच सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात आणले. मात्र या अपघातातील पाच जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हालवण्यात आले आहे तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आल आहे.  पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे मीरा-भाईंदर येथील आहेत.

घटनास्थळी मदतीकरता खेड येथील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नागरिक, पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती तातडीने कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली.

Web Title: Mumbai Goa Highway Car Accident Today: The Jagbudi river has become black again! A car carrying passengers going to a funeral fell into the river; 5 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.