धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:06 IST2026-02-05T14:04:32+5:302026-02-05T14:06:19+5:30

Mumbai Crime: अत्याचारानंतर तरुणी गरोदर; पोटदुखीच्या तक्रारीतून प्रकरण उघडकीस!

Mumbai Crime: Disabled girl sexually assaulted by father; Arrested after DNA report | धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक

धक्कादायक! मुंबईतील दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; डीएनए अहवालानंतर अटक

Mumbai Crime:मुंबईतील कफ परेड परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय दिव्यांग तरुणीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ऐकू किंवा बोलू शकत नाही. अशा परिस्थितीत, गेल्या काही महिन्यांपासून नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होत. अखेर डीएनए तपासणीत गर्भातील भ्रूणाचा जैविक संबंध वडिलांशी जुळल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. 

डीएनए अहवालातून वडिलांचा सहभाग स्पष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2026 रोजी आलेल्या डीएनए तपासणी अहवालात गर्भातील भ्रूणाचा डीएनए पीडितेच्या वडिलांशी पूर्णपणे जुळला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात इतर संशयितांची भूमिकादेखील तपासात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

17 संशयितांचे डीएनए नमुने तपासले

तपासादरम्यान, पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी एका प्रौढ व्यक्तीला अटक केली होती, तसेच 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते. पीडितेने हातवाऱ्यांद्वारे या दोघांची ओळख संशयित म्हणून करून दिली होती. एकूण 17 संशयितांचे डीएनए आणि रक्त नमुने घेण्यात आले. भ्रूणाच्या जेनेटिक डेटाशी तुलना केल्यानंतर फक्त एकच पॉझिटिव्ह मॅच आढळून आला, जो पीडितेच्या वडिलांचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोटदुखीच्या तक्रारीतून प्रकरण उघडकीस

सप्टेंबर 2025 मध्ये पीडित तरुणीने आपल्या आजीकडे पोटदुखीची तक्रार केली होती. हाताच्या खुणांद्वारे तिने पोटात काहीतरी रेंगाळत असल्याची भावना व्यक्त केली. यानंतर तिला मुंबईतील कामा अँड अल्बलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

तक्रार नोंदवण्यासाठी समुपदेशनाची गरज

पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला पीडितेला संवाद साधण्यात अडचणी येत होत्या आणि ती तक्रार देण्यासही तयार नव्हती. या दरम्यान पोलिसांनी तिच्या वडिलांशी चौकशी केली असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि तक्रार नोंदवण्यास विरोध केला. मात्र, समुपदेशनानंतर पीडिता तक्रार नोंदवण्यास तयार झाली, त्यानंतर तपासाला गती मिळाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा लैंगिक अत्याचार मार्च 2025 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान झाल्याची शक्यता आहे.

Web Title : चौंकाने वाला! मुंबई: दिव्यांग युवती से पिता द्वारा यौन उत्पीड़न; डीएनए रिपोर्ट के बाद गिरफ्तार

Web Summary : मुंबई: एक दिव्यांग युवती के साथ उसके पिता ने यौन उत्पीड़न किया। डीएनए से गर्भावस्था के बाद उसकी संलिप्तता की पुष्टि हुई। उसे गिरफ्तार कर लिया गया है, और अन्य संभावित संदिग्धों की पहचान के लिए आगे की जांच चल रही है।

Web Title : Shocking! Mumbai: Disabled woman sexually assaulted by father; arrested after DNA report.

Web Summary : Mumbai: A disabled woman was sexually assaulted by her father. DNA confirmed his involvement after a pregnancy was discovered. He has been arrested, and further investigation is underway to identify other potential suspects.