मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पाकमध्ये जामीन

By Admin | Updated: December 19, 2014 05:13 IST2014-12-19T05:13:20+5:302014-12-19T05:13:20+5:30

पेशावरमधील हत्याकांडानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आक्रमक वक्तव्य केल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आतच

Mumbai attack mastermind secures bail in Pak | मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पाकमध्ये जामीन

मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पाकमध्ये जामीन

इस्लामाबाद /नवी दिल्ली : पेशावरमधील हत्याकांडानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आक्रमक वक्तव्य केल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आतच २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामागील एक प्रमुख सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झकीउर रहमान लखवी पाकिस्तानात जामिनावर सुटला.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भाषा आणि न्यायालयाचा हा विरोधाभासी निकाल या पार्श्वभूमीवर भारतात पाकविरुद्ध जनक्षोभ निर्माण होऊ लागला आहे. अर्थात त्याचवेळी पाकिस्तानने खैबर आदिवासी प्रांतात हवाई हल्ले करून ५७ अतिरेक्यांना ठार मारले. मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकमध्ये लखवीसह सात जणांविरुद्ध खटला सुरू आहे. त्यात इस्लामाबादेतील दहशतवादविरोधी न्यायालयाने झकीउर रहमान लखवी याला जामीन मंजूर केला.

Web Title: Mumbai attack mastermind secures bail in Pak