AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:00 IST2025-11-12T11:57:57+5:302025-11-12T12:00:15+5:30
Maharashtra ATS: पुण्यातील अल-कायदा प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एका शिक्षकाच्या घरात छापा टाकला.

AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने पुण्यातील अल-कायदा प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात मोठी कारवाई केली. एटीएसच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरातील एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकला असून, मुलांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून त्याची चौकशी सुरू आहे.
इब्राहिम अबिदी, असे कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव असून तो मुंब्रा येथील कौसा परिसरात भाड्याने राहतो. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम अबिदी ज्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता, तिथे छापा टाकण्यात आला. शिवाय, त्याच्या कुर्ल्यातील दुसऱ्या पत्नीच्या घराचीही एटीएसने झडती घेतली आहे.
Maharashtra ATS:The Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) conducted a raid at the residence of a teacher identified as Ibrahim Abidi in the Mumbra Kausa area.Abidi lived in a rented flat and taught Urdu every Sunday at a mosque in Kurla. His second wife’s house in Kurla was also…
— IANS (@ians_india) November 12, 2025
एटीएसला संशय आहे की, शिक्षक म्हणून काम करत असलेला अबिदी हा मुलांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचे काम करत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एटीएसने ही कारवाई केली. या छाप्यात एटीएसने अबिदीच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ही उपकरणे तपासासाठी पाठवण्यात येणार आहे. जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
एटीएसची ही कारवाई पुण्यातील अल-कायदा प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पुणे आणि मुंबईतून काही संशयितांना अटक करण्यात आली होती, ज्यांचा संबंध अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी असल्याचे उघड झाले होते.