शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:00 IST

Mumbai: वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा प्राण्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला आहे, तर अन्य प्राण्यांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला आहे. त्यामुळे प्राण्यांचे वाढते आजार हा चिंतेचा विषय बनला आहे. प्राणिसंग्रहालयात एका वर्षात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा प्राण्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला आहे, तर सर्वाधिक म्हणजे १० पेक्षा जास्त प्राण्यांचा मृत्यू हृदयविकार व श्वसनासंबंधी आजारांमुळे झाल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनंतर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे आजार का वाढत आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. 

वृद्धापकाळामुळे मृत प्राणी११ नोव्हेंबर २०२४ रोजी एका मादी हत्तीणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण वृद्धापकाळ व पोटातील गाठ, असे नमूद करण्यात आले. २ फेब्रुवारी २०२५ रोजी एका मगरीचा, याशिवाय दोन पोपट, एक पट्टेरी हायना आणि एक बगळा यांचाही वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

वन्यजीवप्रेमींची चिंताप्राण्यांच्या या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वृद्धापकाळ आणि नैसर्गिक कारणांपलीकडे हृदयविकारासारख्या झटक्यांमुळे झालेले मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

वन्यजीवप्रेमींची चिंताप्राण्यांच्या या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वृद्धापकाळ आणि नैसर्गिक कारणांपलीकडे हृदयविकारासारख्या झटक्यांमुळे झालेले मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यूस्पॉटेड डिअर, बार्किंग डिअर, सांबर, हरण, पेंटेड स्टॉर्क, बगळे व कासवे, अशा अनेक प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या काळात एकट्या हरणांच्या प्रजातींमध्येच ११ मृत्यू झाले असून त्यातील बहुतेकांना कार्डिॲक शॉक किंवा श्वसन विकार कारणीभूत ठरले.

टॅग्स :rani bagichaराणी बगीचाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र